मुंबई : व्हॉट्सअॅपने एका खास फिचरमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘डिलिट फॉर एव्हरिवन’ हे फीचर लाँच केले होते. या फिचरच्या माध्यमातून एखाद्या चॅटमध्ये किंवा ग्रुपवर चुकीने पाठविलेला मेसेज डिलीट करण्याची सुविधा युजर्संना देण्यात आली आहे. सुरुवातीला मेसेज डिलीट करण्याचा वेळ हा ७ मिनिटे होता. त्यानंतर तो वाढवून १ तास १७ मिनिट १६ सेकंद करण्यात आला होता.