– व्हिडीओ पहा
मुंबई : अर्जुन कपूरच्या बहुप्रतिक्षीत ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. ‘रेड’ आणि ‘नो वन जेसिका किल्ड’ फेम दिग्दर्शक राज कुमार गुप्ता दिग्दर्शित हा सिनेमा एका सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येतेय. त्यामुळे या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. अशात काही क्षणांपूर्वी ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. या चित्रपटात एका कुख्यात गुन्हेगाराची कथा रेखाटण्यात आलीय.
२ मिनिटे ३० सेकंदाच्या या ट्रेलरची सुरूवात होते, तीच बॉम्बस्फोटांच्या दृश्यांनी. स्वत:ला भारताचा ओसामा बिन लादेन समजणा-या एका स्वंयघोषित ‘मोस्ट वॉन्टेड’ गुन्हेगाराला पाच जण कसे पकडतात, ते ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कुठलाही रोमॅन्टिक वा फार भावूक असा सीन नाही. तर ‘हार्ड कोर’ अतिरेक्यांचे जग आणि देशाची व्यवस्थेचे वास्तव दाखवणारा हा ट्रेलर आहे. फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणची निर्मिती असलेल्या या सिनेमात अर्जुनशिवाय अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.