एक दीन का सीएम – व्हिडिओ पहा
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना व घटक पक्षांच्या महायुतीचा विजय झाला. निकालाला आठवडा उलटला आहे. तरीही अद्याप सत्तावाटपातील संघर्ष शमलेला नाही. समसमान वाटपासाठी शिवसेनेचा आग्रह आहे, तर मुख्यमंत्रिपद आणि इतर महत्त्वाची खाती न देण्याचा भाजपचा पवित्रा आहे. यामुळे राजकीय पटलावर महत्त्वाच्या पदावरून गोंधळाची स्थिती दिसून येतेय आता या सर्व राजकीय गोंधळात एका ट्विटर युजरने मुख्यमंत्रिपदाबद्दल तोडगा काढत भन्नाट कल्पना दिली.
मैं nayak ही टीक हूँ 😎@vijaymau https://t.co/zs7OPYEvCP
— Anil Kapoor (@AnilKapoor) October 31, 2019
- सन २००१ मध्ये आलेल्या ‘नायक’ सिनेमातील नायक अनिल कपूरच्या अभिनयाचा संदर्भ देत त्याने लिहिले की, “महाराष्ट्र में जब तक कोई रास्ता नहीं निकलता, तब तक अनिल कपूर को ही मुख्यमंत्री बना कर देख लेते हैं. परदे पर उनका एक दिन का कार्यकाल पुरे देश ने देखा और सहारा है. देवेंद्र फडणवीस और आदित्य ठाकरे क्या सोच रहें हैं?
अनिल कपूर यांना टॅग करून लिहिलेल्या या पोस्टवर आता त्यांनीच रिप्लाय दिलाय. अनिल कपूर लिहितात की, “मैं नायक ही ठीक हूँ (मी अभिनेता म्हणूनच ठीक आहे.)” अनिल कपूर यांच्याशिवाय ‘नायक’ या चित्रपटात राणी मुखर्जी आणि दिवंगत अमरीश पुरी यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या. एस. शंकर दिग्दर्शित, राजकीय- अॅक्शन थ्रिलर हा सिनेमा ७ सप्टेंबर २००१ रोजी प्रदर्शित झाला होता.