ते म्हणाले की, शिवसेनेने काल अधिकृतरित्या काँग्रेस, राष्ट्रवादीला पाठिंब्याबाबत विचारले होते. आम्ही किमान समान कार्यक्रम ठरवल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठी ४८ तासांची मुदत मागितली. मात्र, त्यांनी ती मान्य केली नाही. महाराष्ट्रात लागू केलेली राष्ट्रपती राजवट चूकीची आहे. राष्ट्रपती राजवटीविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली नाही.