पिंपरी चिंचवड : बुद्धवासी शंकर शेखा चौधरी यांच्या २३ व्या पुण्यस्मरणा निम्मित्त धम्मानंद प्रतिष्ठाण तर्फे यशवंतनगर येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा या ठिकाणी वहि पेन वाटप हा उपक्रम राबविण्यात आला. गेले २ वर्षांच्या करोना काळानंतर शाळेत येणाऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणुन विद्यार्थांना वही पेन चे वाटप करण्यात आले.
यावेळी धम्मानंद प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भोसरी विधान सभेचे चिटणीस अविनाश चौधरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रा. शाळेतील मुख्याध्यापिका राऊत मॅडम, क प्रभाग अभियंता ए.एम. ढवळे, धम्मानंद प्रतिष्ठाण चे संस्थापक परमेश्वर चौधरी, नेहरुनगर वार्ड अध्यक्ष राजु लोखंडे, किरतकर्वे गुरुजी, उद्योजक नागेश निघोटकर ,रविराज चौधरी, कर्मविर कदम, निलेश गायकवाड, ताई आढाळे, राणी ठाणांबिर, कोकिरकर मावशी, सुर्यवंशी काकु, निशांत गायकवाड, प्रविण शिंदे, निखिल वाघमारे, गौरव चौधरी, राजेश कदम, राजरत्न चौधरी, मनोज कदम, धिरज जगदाळे, मयुर माने व इतर मान्यवर उपस्थित होते.