निगडी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सजवलेल्या रथातून अहिल्यादेवींच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. घोडे, उंट, ढोल ताशे, हलगी तसेच धनगर समाजाचे पारंपरिक गज नृत्य पथकाच्या निनादात ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ च्या जयघोषात भांडाऱ्याची उधळण करत भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत हजारो समाज बांधव सहभागी झाले होते. रुपीनगर येथील एकता चौकातून शोभा यात्रेची सुरवात होऊन ज्ञानदीप विद्यालया समोर शोभा यात्रेची सांगता झाली.
शोभा यात्रा संपन्न झाल्या नंतर प्रतिष्ठान च्या वतीने अभिवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अभिवादन सभे साठी माजी कॅबिनेट मंत्री राम शिंदे , समस्त हिंदू एकता समितीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे, आमदार महेश लांडगे, रासप नेते बाळासाहेब दौडतले, ऑल इंडिया धनगर समाज महामंडळ प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे, प्रवीण भालेकर, पंकज भालेकर ,पौर्णिमा सोनवणे ,शांताराम को.भालेकर, राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे , धनंजय वरणेकर,विशाल मानकरी, शरद भालेकर,धनंजय भालेकर , पांडुरंग भालेकर , सुखदेव नरळे, अनिल भालेकर , अरुण थोपटे , बप्पा जाधव, महावीर काळे , बंडू मारकड ,काका मारकड , बिभीषण घोडके आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राजकिय क्षेत्र आमदार महेश लांडगे , शैक्षणिक क्षेत्र सुबोध गलांडे, वैद्यकीय क्षेत्र डॉ. राम तांबे , पर्यावरण क्षेत्र निसर्ग राजा मित्र जीवांचे , गोरक्षण क्षेत्र सागर चव्हाण ,सामाजिक क्षेत्र शांताराम भालेकर आदी मान्यवरांना उल्लेखनीय कार्य बद्दल विशेष सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अहिल्यादेवी प्रतिष्ठाण चे अध्यक्ष गजानन वाघमोडे , सचिव राजेंद्र सोनटक्के , उपाध्यक्ष दत्ता करे, सुनील बनसोडे ,कार्याध्यक्ष शिवाजी बिटके , नाना गावडे , संजय रुपनवर, सचिन नायकवडे, विनोद नवले ,संतोष देवकाते , नितीन वाघमोडे सह प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांनी घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजीत चौगुले यांनी केले तर आभार शिवाजी बिटके यांनी मानले.