पिंपरी चिंचवड : माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षक महामंडळाच्या पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष पदी संतोष देविदास म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. म्हात्रे यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळाचे संचालक निवृत्ती काळभोर व अध्यक्ष फिरोज शेख यांनी निवडीचेे पत्र दिले आहे.
संतोष म्हात्रे हे अंतरराष्ट्रीय खेळाडू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर किक बॉक्सिंग स्पर्धेत प्राविण्य मिळवले असून त्यांनी १३ राष्ट्रीय पदके व दोन वेळा आंतरराष्ट्रीय पदक मिळविले आहेत. आर्यन्स मार्शल आर्ट्स (इंडिया) चे संस्थापक अध्यक्ष व महाराष्ट्र किकबाॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.
म्हात्रे यांनी आर्यन मार्शल आर्ट या संस्थेच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना घडविले आहे. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना युवाभुषण समाज पुरस्कार, पुणे रत्न पुरस्कार,उत्कुष्ट कोच पुरस्कार,मेजर ध्यानचंद पुरस्कार,क्रीडा भुषण पुरस्कार, बेस्ट रेफरी राष्ट्रीय पुरस्कार आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सध्या ते किक बॉक्सिंग खेळासाठी महाराष्ट्र व भारतासाठी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत.