पिंपरी चिंचवड : महापालिका निवडणुकीसाठी त्रिसदस्यीय प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा मंगळवारी (दि.१) सकाळी दहाला जाहीर करण्यात आला. महापालिका भवन व सर्व ८ क्षेत्रीय कार्यालयात तसेच, महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in. या संकेतस्थळावर प्रभागरचना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
प्रभागाचे नकाशे व त्यातील समाविष्ट भाग पाहण्यात नागरिक तसेच, इच्छुक दंग झाले होते. अपेक्षेनुसार प्रभाग असल्याने काहींनी आनंद व्यक्त केला तर, प्रभाग तुटल्याने काहींनी नाराजी व्यक्त केली. प्रभागासोबत एससी व एसटीची लोकसंख्या दिल्याने कोणत्या प्रभागात त्या वर्गाचे आरक्षण पडणार हे स्पष्ट झाले. (Pimpri-Chinchwad Municipal)दरम्यान, महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रभागरचना पाहण्यास अनेकांनी पसंती दिली. एकूण ४६ प्रभाग असून, त्यातील ४५ प्रभाग हे तीन सदस्यांचे व सांगवी प्रभाग क्रमांक ४६ हा चार सदस्यांचा प्रभाग आहे.
प्रभाग क्रमांक १६, १७, १८ याची प्रभाग रचना पुढीलप्रमाणे आहे….
प्रभाग क्रमांक – १६
एकूण लोकसंख्या – ३५४२४
अ.जा. – ६९५०
अ. ज. – ३७०
प्रभागाची व्याप्ती : नेहरुनगर, अंतरीक्ष सोसायटी, विठ्ठलनगर, मगर स्टेडीयम, टाटा मोटर्स, अमृतेश्वर कॉलनी, यशवंतनगर इ.
उत्तर : स्पाईन रस्ता
पूर्व : मर्सिडीझ बेंझ क्रांती चौकातून दक्षिणेकडे भोसरी पिंपरी शीवेवरील टेल्को वेलफेअर रस्त्याने व पुढे शीवेवरील नाल्याने टाटा मोटर्स (टेल्को) रस्ता गुलाब पुष्प उद्यानापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस एम.एस.ई.बी. पॉवर सब स्टेशन पर्यंत (बालाजी नगर) व पुढे दक्षिणेस ओम चेंबर्स लगतच्या रस्त्याने जय अंबे एंटरप्रायजेस पर्यत व त्याच रस्त्याने पश्चिमेस ईश्वर मेटल्स पर्यत व तेथून पश्चिमेस क क्षेत्रिय कार्यालयाच्या लगतच्या रस्त्याने हॉकी स्टेडीयम नेहरुनगर रस्त्याने पी.एम.पी.एम.एल बस डेपो रस्त्याने नाल्यापर्यत.
दक्षिण : नाल्यापासून पश्चिमेकडे रोहन हाईटच्या मोकळ्या जागेतून नाल्याने मुकेश नगर रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस यशवंतराव चव्हाण रस्त्यापर्यत व त्याच रस्त्याने उत्तरेस संतोषी माता चौकापर्यत व चौकातून झिरो बॉईज चौकापर्यत व चौकातून पश्चिमेस वास्तु उद्योग रस्त्याने रसरंग चौकापर्यत व तेथून उत्तरेस अंतरिक्ष सोसायटी रस्त्याने टेल्को वेलफेअर सोसायटी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस सुमंत सरोवर अमृतेश्वर कॉलनी पर्यत व सुमंत सरोवर पासून पश्चिमेस मोरवाडी रस्त्यापर्यत.
पश्चिम : मोरवाडी रोड, अमृतेश्वर कॉलनीपासून आयुक्त बंगला लगतच्या रस्त्याने उत्तरेस के.एस.बी. चौकापर्यत व पुढे उत्तरेस स्पाईन ब्रीज, रोटरी कुदळवाडी चिखली पर्यंत.
प्रभाग क्रमांक – १७
एकूण लोकसंख्या – ३४१५०
अ.जा. – ६३४२
अ.ज – ६६८
प्रभागाची व्याप्ती : वल्लभनगर, एच.ए. कॉलनी, वाय.सी.एम.एच., संत तुकारामनगर, महेशनगर, महात्मा फुले नगर इ.
उत्तर : गांधीनगर महिंद्रा अँन्थीया कॉर्नर पासून पिंपरी नेहरुनगर रस्त्याने पुर्वेस संतोषी माता चौकापर्यत.
पूर्व : संतोषी माता चौकापासून दक्षिणेस यशवंतराव चव्हाण रस्त्याने मुकेश नगर रस्त्याच्या अनुष्का ट्रेडर्स पर्यंत व त्याच रस्त्याने पुर्वेस नैसर्गिक नाल्यापर्यत व त्याच नाल्याने दक्षिणेस डॉ. डी.वाय.पाटील होमिओपॅथिक कॉलेज लगतच्या बाजुने पवना इंडस्ट्रीयल इस्टेटच्या मागील बाजुने महात्मा फुले नगर लगतच्या रस्त्याने फिलिप्स कंपनी समोरील रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने पश्चिमेस नाल्यापर्यंत व त्याच नाल्याने स्वरगंगा सोसायटीच्या मागील नाल्यापर्यंत.
दक्षिण : स्वरगंगा सोसायटीच्या मागील नाल्याने पश्चिमेस श्री. खंडोबा मंदिरापर्यत व तेथून पश्चिमेस सेंट अँन्थोनी उद्यानापर्यत व सेंट अँन्थोनी उद्यानापासून उत्तरेस तुळजा भवानी मंदिरापर्यत व मंदिरापासून पश्चिमेस यशवंत चौकापर्यत व चौकातून उत्तरेस अहिल्याबाई होळकर ग्राऊंड लगतच्या रस्त्याने लांडेवाडी फिलिप्स रस्त्यापर्यत व त्याच रस्त्याने पश्चिमेस यशवंतराव चव्हाण रस्त्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापर्यत व त्याच रस्त्याने दक्षिणेस बैंडमिटन हॉल व संत तुकाराम मंदिरापर्यंत व तेथून गायकवाड हरिभाऊ विनायक रस्ता व डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज हॉस्टेलच्या मागील रस्त्याने उत्तरेस डॉ. डी.वाय.पाटील समोरील मुंबई -पुणे रस्त्याला जोडणा-या (संत श्री.गाडगेमहाराज पथ) रस्त्यापर्यत व त्याच रस्त्याने पश्चिमेस जुना मुंबई पुणे रस्ता इंडीयन ऑईल पेट्रोल पंपापर्यंत.
पश्चिम : इंडीयन ऑईल पेट्रोल पंप जुना पुणे-मुंबई रस्त्यापासून उत्तरेस खराळवाडी रस्ता हॉटेल राज पर्यत व त्याच रस्त्याने पुर्वेस खराळवाडी उर्दु माध्यमिक शाळा व बकाऊल्फ हौ. सोसा. बाजुने उत्तरेस गांधीनगर महिंद्रा अॅन्थीया कॉर्नर पिंपरी नेहरुनगर रस्त्यापर्यंत.
प्रभाग क्रमांक – १८
एकूण लोकसंख्या – ३८२४४
अ.जा – ७९९९
अ.ज – ३८३
प्रभागाची व्याप्ती : म.न.पा. भवन, मोरवाडी, ज्ञानेश्वरनगर, एम्पायर इस्टेट, अजमेरा कॉलनी, विशाल थिएटर, गांधीनगर, खराळवाडी इ.
उत्तर : रेल्वे लाईन पासून एम्पायर इस्टेट रांका ज्वेलर्सच्या मागच्या बाजुने पुणे मुंबई रस्त्यापर्यंत व तो रस्ता ओलांडून अँटो क्लस्टर समोरील रस्त्याने आय.बी.एम.आर. कॉलेज रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने दक्षिणेस मोरवाडी रस्त्यापर्यंत व त्याच रस्त्याने उत्तरेस अमृतेश्वर कॉलनी व सुमंत सरोवरच्या मोकळ्या जागेतून अतंरिक्ष सोसायटी रस्त्यापर्यंत.
पूर्व : अंतरिक्ष सोसायटी रस्त्याने दक्षिणेस रसरंग चौकापर्यत व तेथून पुर्वेस वास्तु उद्योग रस्त्याने झिरो बॉईज चौकापर्यत व त्याच चौकातून रस्त्याने संतोषी माता चौकापर्यंत.
दक्षिण : संतोषी माता चौकातून नेहरुनगर पिंपरी रस्त्याने महिंद्रा अँन्धीया टाऊनशीप कॉर्नर गांधीनगर रस्त्यालगत व तेथून दक्षिणेस खराळवाडी रस्त्याने बकाऊल्फ हौ. सोसा. बाजुने व खराळवाडी उर्दु माध्यमिक स्कुल लगतच्या रस्त्याने जुना मुंबई पुणे रस्त्यापर्यत व पिंपरी पोस्ट ऑफीस पासपोर्ट सेवा केंद्रा समोरील रस्ता ओलांडून रेल्वे लाईन पर्यत.
पश्चिम : रेल्वे लाईन.