मुंबई : महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. हाच पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.