पिंपरी चिंचवड : ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने मी मराठी….. स्वाक्षरी मराठी…. ही मोहीम राबवून “मराठी राजभाषा दिन” रहाटणी येथे साजरा करण्यात आला.
यावेळी चित्रपट सेनेचे दत्ता घुले , प्रज्ञा पाटील , शिवनाथ दिलपाक , प्रसाद खैरे , सुरज लोणकर , रोहन पवार , वैजनाथ डोपरे , रोहित थोरात , हार्षल कोळेकर , निलेश नेटके,राकेश भानूसे , डाॅ.मिलिंद राजे भोसले, सुरज राक्षे,धिरज धेंडे , वैजिनाथ ढोपरे, ॠषीकेश थोरात, विक्रम आडे आदी उपस्थित उपस्थीत होते. या मोहिमेचे आयोजन मनसे चित्रपट सेनेचे शहर उपाध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी केले होते.
मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, मराठी भाषा दैनंदिन जीवनात अधिकाधिक वापरली जाईल किंबहुना जावी, या हेतूने जागतिक मराठी राज्य भाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या वतीने ‘मी मराठी… स्वाक्षरी मराठी..! ही मराठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आलीे.
– अभिनेत्री प्रज्ञा पाटील