पुणे : मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार, २९ जुलै) जाहीर होणार आहे. हा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार जाहीर केला जात असल्याचे कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा तर्फे इ.१० वी चा निकाल उद्या दिनांक २९/०७/२०२० रोजी दुपारी ०१:०० वाजता जाहीर करण्यात येणार. इ. १० वीच्या सर्व
विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी खूप शुभेच्छा ! @CMOMaharashtra @bb_thorat @AjitPawarSpeaks #examresults #sscresult pic.twitter.com/peHKZP2KY9— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 28, 2020
मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक, कोल्हापूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या अधिकृत संकेतस्थळावर उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण मंडळाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.in वर उपलब्ध होणार आहे.