मिळालेल्या माहितीनुसार, सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग येथे गेले होते. तेथून पुन्हा पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. तर या अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट एक्सकोट टीम आणि अपघात ग्रस्त टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. टेम्पो खाली चिरडलेल्यांना बाहेर काढण्यात मदत करण्यात आली. खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाती टेम्पो रस्त्यातून बाजूला केला.