पुणे : पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्यात बैठक झाली. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये येत्या सोमवार ( दि. १३ जुलै ) पासून पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा व नवीन नियमावली हे आज सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
अजित पवारांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधत पुणे व पिंपरी चिंचवड मधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यात उपाय योजनांवर देखील सखोल चर्चा झाली. सर्वानुमते पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याची विनंती करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये येत्या सोमवार ( दि. १३ जुलै ) पासून पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीची अधिकृत घोषणा व नवीन नियमावली हे आज सायंकाळी जाहीर करण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांत पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. जवळपास शहरातील रुग्णांचा आकडा हा २५ हजारांच्या वर गेला आहे. त्याच धर्तीवर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊनचा पर्याय वापरण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा लॉकडाऊन पंधरा दिवसांचा राहणार असून तो १३ जुलैच्या मध्यरात्रीपासून जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. लॉकडाऊनचा निर्णय जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्तांसह व इतर वरिष्ठ अधिकारी मिळून घेणार आहे. लॉकडाऊन संबंधी तयारी करण्याच्या सूचना देखील पोलिसांसह प्रशासनाला देण्यात आल्या आहे.