पुणे : छावा स्वराज्य सेना, महाराष्ट्र राज्य संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील) व प्रदेश कार्यकारिणी यांच्या एकमताने संपर्क कार्यालय एफ .सी .रोड पुणे, येथे बैठकीत विवेक अत्रे यांची प्रदेश संघटक पदावर निवड करण्यात आली आहे.
यावेळी छावा स्वराज्य सेना, संस्थापक/अध्यक्ष राम घायतिडक (पाटील),प्रदेश अध्यक्ष राजेंद्र पडवळ, प्रदेश कार्याध्यक्ष अरीफ शेख, महिला प्रदेश अध्यक्षा शितल हुलावळे, पश्चिम महाराष्ट्रअध्यक्ष (आयटीसेल) सागर नायडू,पुणे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील पडवळ, पुणे शहर अध्यक्ष गणेश कांबळे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सौरभ सगर, उमेश चांदणे, माया साबळे , काशीफ अरब, सुलतान बागवान, विकास गोळे, विशाल घोणे, नितीन पवार उपस्थित होते.
विवेक अत्रे यांनी संघटनेचे आभार मानत पुढील काळात महाराष्ट्र भर योग्य प्रकारे संघटना वाढवण्यासाठी प्रयत्नशिल असतील व , तसेच बेरोजगार युवक युवतींसाठी कसा रोजगार देता येईल, यासाठी योग्य ते उपक्रम राबवण्यात येतील असेे सांगत त्यांनी आपले विचार स्पष्ट केले.