पिंपरी चिंचवड : सलमानी जमात वेलफेअर ट्रस्ट आयोजित ‘सलमानी प्रीमियर लीग ‘या टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे आयोजन चिंचवड येथील केशवनगरातील श्री महासाधु मोरया गोसावी क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे.या सामन्यांचे आज उद्घाटन करण्यात आले.
समाजातील व्यावसायिकांना खेळाच्या माध्यमातून एकत्र येता यावे व सर्वांचे मनोमिलन व्हावे यासाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.या सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, नगरसेवक सुरेश भोईर, संदीप वाघेरे, माजी नगरसेवक अनंत कोराळे, निहाल पानसरे,कबड्डी खेळाडु मोबिन शेख , संघटनेेेचे अध्यक्ष हबीब शेख, जब्बार शेख, शकील शेख,अब्दुल रौफ शेख , उपाध्यक्ष बरकत शेख, हसन शेख, हसीम शेख, मुश्ताक शेख, इस्रार शेख, नसीम शेख, फारुख शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या क्रिकेट सामन्यासाठी शरातील १८ संघ सहभागी झाले आहेत. निर्धारित षटकांच्या या सामन्यासाठी विशेष बक्षिसे व पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. शहरातील अनेक व्यावसायिक व उद्योजक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.संघटनेचा रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा मानस असल्याने या स्पर्धेच्या आयोजनातून निधी उपलब्ध करण्याचे आवाहन अध्यक्ष शेख यांनी केले आहे.