पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील एच ए मैदानावर राडोरोड व कचरा टाकल्यामुळे या मैदानाला डम्पिंग ग्राऊंड चे स्वरूप प्राप्त झाले असून कचरा राडारोड टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना स्थानिक नगरसेवक राहुल भोसले, समीर मासूळकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे. तसेच या मैदानाला एच ए कंपनीने संरक्षण भिंत बांधून या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमावेत अशी देखील मागणी केली आहे.
नेहरूनगर येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीचे दोन मोठे मैदाने आहेत. या मैदानाच्या संरक्षण भिंती गेल्या अनेक वर्षांपासून जमिनदोस्त झाल्या असल्याने सध्या या मैदानावर कुठूनही प्रवेश मिळवता येत असल्याने अनेक नागरिक, हॉटेल चालक या मैदानाचा उपयोग कचरा टाकण्यासाठी करीत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक राडारोड टाकण्यासाठी या मैदानाचा उपयोग करीत असल्याने या मैदानाला डम्पिंग ग्राऊंड चे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अनेक वेळा या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा पेटवून दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वायुप्रदूषण होऊन त्याचा त्रास नेहरूनगर, महेश नगर, महिंद्रा सोसायटी परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी देखील या बाबत या एच ए कंपनी कडून ठोस उपाय योजना केल्या जात नसल्यामुळे नागरीकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने स्थानिक नगरसेवक राहुल भोसले, समीर मासूळकर यांनी महापालिकेचा अधिकाऱ्यांसमवेत मैदानाची पाहणी करून मैदानावर राडारोडा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सूचना देत एच ए कंपनी व महापालिकेने यावर ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील केली आहे. यावेळी महापालिकेचे उप स्थापत्य अभियंता, राहुल जन्नु, अभियांत्रिकी स्थापत्य विभाग, बाबा साहेब कांबळे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आर एम भोसले, निता घोष, मुख्य सुरक्षा अधिकारी एच, ए कंपनी, संजय पगारे चेअरमन राँयल महिन्द्रा सोसायटी, व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
एच ए मैदानाचा गुन्हेगारी कृत्यांसाठी वापर
एच ए मैदानामुळे पोलिस प्रशासनाची देखील डोके दुखी वाढली आहे. कारण मागील काही वर्षात या मैदानात अंधाराचा फायदा घेऊन गुन्हेगारांनी गुन्हेगारी कृत्यांसाठी या मैदानाचा उपयोग केला असल्याचे उघड झाले आहे. या मैदानात मागील काही वर्षात ३ ते ४ खून झाले आहेत. यामुळे पोलिस प्रशासन देखील आक्रमक पवित्र्यात आहे.
- नगरसेवक राहुल भोसले म्हणाले, एच ए मैदानावरील कचरा, राडारोडा उचलून योग्या त्या ठिकाणी टाकण्यात यावा. एच ए कंपनीने त्वरीत या ठिकाणी दिवस व रात्र पाळीत आपले सुरक्षा रक्षक नेमावे. मैदानाला नवीन सीमा भिंत बांधावी. मैदानावर राडारोडा येथे कचरा टाकताना कुणी निदर्शनास आल्यास महापालिकेने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून कचरा, राडा रोड टाकणारे वाहने देखील जप्त करावेत अशी मागणी केली आहे.