पिंपरी चिंचवड : निरोगी हृदय… निरोगी शहर… या संकल्पनेतून माजी महापौर, नगरसेविका डॉ वैशाली घोडेकर (लोंढे) यांच्या प्रयत्नातून व रुबी हेल्थकेअर सेंटर यांच्या माध्यमातून नेहरूनगर येथील प्रभाग क्रमांक ९ मध्ये गुरुवार ४ मार्च रोजी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
नेहरूनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघ (उत्तर विभाग) विरंगुळा केंद्र, नाना नानी पार्क हॉल येथे गुरुवार ४ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेदरम्यान रुबी हेल्थकेअर सेंटर यांच्या माध्यमातून नागरिकांची हृदयरोगा संदर्भातल्या विविध चाचण्या मोफत केल्या जाणार आहे. यामध्ये बीपी (रक्तदाब) ई सी जी, टू डी इको याचबरोबर डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यकतेनुसार मोफत अँजोग्राफी केली जाईल. तसेच महात्मा फुले जन आरोग्य अंतर्गत एन्जोप्लास्टी देखील केली जाईल. अधिक माहितीसाठी संपर्क माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे) यांच्या कार्यालय मोबाईल क्रमांकावर ९४२३५८३१११ संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
नेहरूनगर प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व नागरिकांनी या मोफत हृदयरोग तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक राहुल भोसले, नगरसेवक समीर मासुळकर, नगरसेविका गीता मंचरकर यांनी केले आहे.