– व्हिडिओ पहा
पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील स्मशानभूमी रस्त्यालगत असलेल्या विश्वगुरू महात्मा बसवेश्वर मठाला शनिवारी सायंकाळी ७.३० दरम्यान आग लागली होती. पिंपरी – चिंचवड महानगपालिकेच्या संत तुकारामनगरच्या २ अग्निशमन बंबामार्फत दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली.
यामध्ये मठाच्या सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून मठामध्ये असलेल्या बसवेश्वर महाराजांचे फोटो, वचन साहित्य, खुर्च्या, टेबल, भजन साहित्य व पुस्तकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.