पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील एच ए मैदान मध्ये झोपड्या मध्ये राहणाऱ्या परिसरात साडेचार फुटाचा नाग त्याच्या दहा पिल्ले व त्यांची आंडी आढळून आल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांच्या परिश्रमानंतर साडे चार फुटाचा नागा सह त्याच्या दहा पिल्लांना सुरक्षितपणे पकडून त्यांना जंगलात सोडून देण्यात आले.
सर्पमित्र बाळासाहेब त्रिभुवन यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळी ९:३० सुमारास नेहरूनगर येथील एच ए मैदानामध्ये बीएसएनएल टॉवर लगत राहणाऱ्या झोपड्यांच्या परिसरात एक मोठा नाग असल्याची माहिती मिळाली. सर्पमित्र बाळासाहेब त्रिभुवन यांनी एच मैदानात गेले असता येथील नागरिकांनी या परिसरात दररोज एक नागाचे पिल्लू आढळून येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. तसेच येथील एका नागरिकाने नागाला जमिनीमध्ये असलेल्या एका बिळात जाताना पाहिल्याचे सांगितले. यानंतर सर्पमित्र बाळासाहेब त्रिभुवन यांनी जमिनीलगत दोन ते तीन फुटांचा खड्डा खणून तीन तांसाच्या अथक प्रयत्नांनी आत मध्ये असलेल्या नागाला व त्यांच्या पिल्लांना सुरक्षितपणे पकडून त्यांना जंगलात सोडून जीवनदान दिले आहे.