पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील ज्योती इंग्लिश हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला ज्योती इंग्लिश हायस्कूलच्या अध्यक्षा ॲड रूपाली वाघेरे, मुख्याध्यापिका अनघा कुलथे, शिक्षिका आरती गायकवाड, नायब मंगलगट्टी आदी शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. ॲड वाघेरे व कुलथे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अक्षदा कवडे, अनुष्का, सोनाक्षी, तनया पवार या ओ राजे हो जगदंब मल्हारी या गाण्यावर नृत्य सादर केले.
ॲड रूपाली वाघेरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्या म्हणाल्या शिवाजीराजे हे फक्त राजे नव्हते तर ते स्वतंत्र नीतिमान व सुसंस्कृतयुक्त समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. शिवरायांनी राजमाता जिजाऊंनी पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविले होते. कुलथे म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज यांच्या सारखे कर्तुत्वान होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे सांगितले.