पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील ज्योती इंग्लिश हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. १५ वर्षे व त्यावरील वयाच्या विद्यार्थ्यांनी लसीकरणात सहभाग घेतला. त्यांना नेहरूनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोवॅक्सिन ही लस देवून त्यांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी नेहरूनगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या स्टाफ नर्स प्रिया जाधवर, मेघना पवार, टेक माया रोका यांनी विद्यार्थ्यांना कोरोना लसीकरणा विषयी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
ज्योती इंग्लिश हायस्कूलच्या संस्थेच्या अध्यक्षा ॲड रूपाली वाघेरे यांच्या हस्ते स्टाफ नर्स प्रिया जाधवर, मेघना पवार, टेक माया रोका यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापिका अनघा कुलथे, शिक्षिका सई पवार व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.