पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील ज्योती इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्योती इंग्लिश हायस्कूल संस्थेच्या अध्यक्षा ॲड रूपाली वाघेरे, मुख्याध्यापिका अनघा कुलथे, शिक्षिका सई पवार, क्रिडा शिक्षक शशिकांत गायकवाड आदी शिक्षक उपस्थित होते. सई पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झेंडा गीत सादर करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी इंटरनॅशनल कराटे कप २०२१ या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या शशिकांत वाघमारे व दृत्तीय क्रमांक मिळविलेल्या ओम शेट्टी या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या अध्यक्षा ॲड रूपाली वाघेरे यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
ॲड रूपाली वाघेरे यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपले विचार मांडले, करोना ही एक लढाई आहे, त्यामध्ये आपल्या सगळ्यांना जिंकायचे आहे, आणि करोना काळात ऑनलाइन शिक्षण घेताना तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे वापर करून भावी पिढीला आपण तंत्रज्ञानाच्या जगात कसे तयार करायचे याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन केले.
डॉक्टर हे रात्रंदिवस समाजासाठी झटत असून कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये देखील जीवाची पर्वा न करता सैनिकांसारखेच कार्य करत आहे असल्याबद्दल त्यांनी त्यांनी सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. पुन्हा कोरोनाचा मोठा प्रमाणावर फैलाव होत असल्याने विद्यार्थ्यांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहन रुपाली वाघेरे यांनी केले.
मुख्याध्यापिका अनघा कुलथे विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगी बाळगल्या पाहिजे, आई वडिलांचा मान ठेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग घेऊन त्यांचे ध्येय गाठले पाहिजे असे विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनश्री जाधव यांनी केले.तर आभार शिक्षिका सलमा आवटी यांनी मानले.