नवी दिल्ली : पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत देशातील ८० कोटी गरीबांना धान्य मोफत दिलं जाणार असल्याची महत्त्वाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. एवढंच नाही तर संपूर्ण देशात वन नेशन वन रेशन कार्ड योजनाही लवकरच लागू केली जाणार आहे अशीही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. जे करदाते आहेत त्यांना मी अभिवादन करतो त्यांनी प्रामाणिकपणे त्यांचा कर भरला त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो असंही मोदींनी म्हटलं आहे.
Prime Minister @narendramodi announces extension of PM Garib Kalyan Ann Yojana (#PMGKAY) till November 2020;
More than 80 crore people will benefit
Government will spend more than Rs 90,000 crore towards the extension of the scheme
Details: https://t.co/ZLKLrt19I9 pic.twitter.com/rDLPG4vlcS
— PIB India (@PIB_India) June 30, 2020
कोरोना संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील नागरिकांना पुन्हा एकदा संबोधित केलं आहे. लॉकडाऊनच्या काळात काटेकोर नियम पाळणारे नागरिक आता अनलॉकमध्ये बेजबाबदारपणे वागत असल्याचं त्यांनी म्हंटलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर नियंत्रण आणण्यासाठी स्थानिक पातळीपासून सर्वांनीच अधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळसी व्यक्त केलं आहे.
कोरोना परिस्थितीवर बोलतांना त्यांनी भारतामध्ये इतर देशाच्या तुलनेत परिस्थिती अटोक्यात असल्याचं म्हंटल आहे. कोरोना संकट हे दीर्घ काळासाठी असल्यामुळं कुणीही गरीब उपाशी झोपू नये यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार आता दिवाळी व छठ पुजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राबवली जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी स्पष्ट केलं आहे. ८० कोटी जनतेला मोफत धान्यपुरवठा देणारी योजना नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील पाच महिने देणार असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. याशिवाय वन नेशन वन रेशन कार्ड ही योजना लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
- मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- वेळीच लॉकडाऊन लागू केल्यामुळे देशातील परिस्थिती स्थिर, तरी सर्वांनी खबरदारी घेणे गरजेचे.
- कंटेन्टमेंट झोनमध्ये अधिकची काळजी घ्यायला हवी.
- अनलॉकमध्ये नागरिक बेजबाबदारपणे वागत आहे, वैयक्तिक व सामाजिक परिस्थितीत दुर्लक्ष केलं जात आहे. ही चिंतेची बाब आहे.
- लॉकडाऊनदरम्यान गांभीर्याने नियमांचे पालन करण्यात आले होते. मात्र आता देशातील नागरिक, संस्था पुन्हा तशाच स्वरुपातील सतर्कता दाखविण्याची गरज आहे.
- गावाचा प्रधान असो की नगरसेवक सगळ्यांनी नियमांचे पालन करायला हवे.
- कोरोनाचे संकट ओळखून लाखो लोकांचे प्राण लॉकडाऊनच्या नियमांमुळे वाचले. नियमांचं पालन न करणाऱ्या लोकांना रोखायला हवं, स्थानिक प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. नियमाच्या वर पंतप्रधानसुद्धा नाही.
- कोरोनाच्या संकट काळातील तीन महिन्यात गरिबांच्या 20 कोटी जनधन खात्यांवर 31 हजार कोटी रुपये जमा केले गेले.
- प्रधानमंत्री अन्नसुरक्षा योजनेचा विस्तार नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार. दिवाळी, छठपूजा होईपर्यंत मोफत धान्य मिळेल. दर महिन्याला प्रत्येक गरीब कुटुंबातल्या सदस्यांना प्रत्येकी पाच किलो गहू किंवा पाच किलो तांदूळ दर महिन्याला मिळेल.