मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्ताने संपूर्ण सिनेसृष्टीला एक मोठा झटका बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत याचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत ने अपने बांद्रा वाले घर में फांसी लगाकर खुदकुशी की। पुलिस टीम घटनास्थल पर मौजूद। pic.twitter.com/N7AuTaKGPA
— ANI_HindiNews (@AHindinews) June 14, 2020
सुशांत सिंह राजपूत याने ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते, तर ‘काय पो छे’ हा त्याचा बॉलीवूडमधील पहिला चित्रपट होता. टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या आयुष्यावर आधारित ‘धोनी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. तसेच त्याचा केदारनाथ हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. ‘छिछोरे’ या चित्रपटात तो अखेरचा दिसला.