नवी दिल्ली : फुटविअर निर्माता कंपनी ‘प्यूमा’ने (Puma) भारतात पहिलं स्मार्टवॉच (Smart Watch) लॉन्च केलं आहे. हे घड्याळ गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च करण्यात आलं होतं. जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीने फॉसिल ग्रुपसोबत हे स्मार्टवॉच डिझाइन केलं आहे. पहिल्यांदाच ‘प्यूमा’ने भारतात स्मार्टवॉच लॉन्च केलं आहे. हे स्मार्टवॉच भारतीय बाजारात येण्याने ग्राहकांसाठी आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
‘प्यूमा’च्या या स्मार्टवॉचची किंमत १९, ९९५ रुपये इतकी आहे. हे स्मार्टवॉच संपूर्ण भारतात प्यूमा स्टोर्समध्ये उपलब्ध असणार आहे. स्मार्टवॉच ऑनलाईन खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्ट आणि Puma.comवरही उपलब्ध असणार आहे. कंपनीकडून ‘प्यूमा’ स्मार्टवॉचवर २ वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.
प्यूमा स्मार्टवॉच, गुगल फिटद्वारे वर्कआऊट रोइंग, स्पिनिंग, पायलेट्स, काउंट रिप्स यांसारख्या ऍक्टिव्हीटीही ट्रॅक करतो. स्मार्टवॉचला वर्कआऊट मोटवर सेट केल्यानंतर ते सतत हृदयाचे ठोकेही ट्रॅक करतं. हे स्मार्टवॉच एक ओएस (OS)डिवाइस आहे. त्यामुळे गुगल असिस्टेंट यात इन-बिल्ट आहे. स्मार्टवॉच स्विम प्रुफ असून आणि गुगल पेच्या माध्यमातून यात पैसेही पाठवले जाऊ शकतात. प्यूमा स्मार्टफोनची बॅटरी १ ते २ दिवसांपर्यंत चालणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.