पिंपरी चिंचवड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रेरणादायी विचारांवर आधारित व महामानवाचे या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदीप मस्के व प्रवीण डोळस मित्र परिवाराच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे “माणसं ज्याप्रमाणे म्हणतात त्याप्रमाणे विचारांचा प्रसार प्रचार झाला नाही तर विचार देखील मरतात” यामुळे महामानवांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचा दृष्टिकोन ठेवून आयोजकांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाने दिनांक ५ मे २०२२ पूर्वी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कोणतेही तीन विचार प्रत्येकी पंच्याहत्तर शब्दांत पर्यंतच्या कमाल मर्यादेत सह आवश्यक ते संदर्भ देऊन आयोजकांकडे पाठवायचे आहेत.
स्पर्धेचे स्वरूप ऑनलाइन असून सर्वात प्रभावी व नाविन्यपूर्ण विचार पाठवणाऱ्या स्पर्धकांना मधून अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस काढण्यात येणार आहेत. विजय होणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख रक्कम ३००१, २००१, १००१ तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित एक ग्रंथ पारितोषिक म्हणून देण्यात येणार आहे. स्पर्धेतील पारितोषिके प्राध्यापक दत्तात्रय भालेराव तसेच क्रिडाशिक्षक लक्ष्मण माने यांनी प्रायोजक केली आहेत अशी माहिती आयोजक प्रवीण डोळस व प्रदीप मस्के यांनी दिली.