पिंपरी चिंचवड : नेहरूनगर येथील ज्योती इंग्लिश हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.
ज्योती इंग्लिश हायस्कूलच्या अध्यक्षा ॲड रूपाली वाघेरे, मुख्याध्यापिका अनघा कुलथे, शिक्षिका रुबेका रणभिसे, मिनाक्षी पाटील, शांता गोरडे आदी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. मुख्याध्यापिका अनघा कुलथे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांनी टिळकांविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. ॲड रूपाली वाघेरे यांनी देखील टिळकांच्या जीवनावरील माहिती सांगून त्यांच्या सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
विद्यार्थी कृष्णा कदम वैदेही सोनी, श्रद्धा सिंग, आर्या बोटे, वैष्णवी कुंभार यांनी आपल्या भाषणाद्वारे लोकमान्य टिळकांविषयी माहिती सांगितली.