मुंबई : जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वातील ही दुसरी दु:खद बातमी समोर येत आहे. संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला. ‘तो गेलाय.. ऋषी कपूर गेलाय.. आणि मी उध्वस्त झालोय’; असं ट्विट बिग बींनी केलं.
T 3517 – He's GONE .. ! Rishi Kapoor .. gone .. just passed away ..
I am destroyed !— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 30, 2020
Actor Amitabh Bachchan announces on Twitter that veteran actor Rishi Kapoor has passed away. pic.twitter.com/pwc7Pht68k
— ANI (@ANI) April 30, 2020
बुधवारी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रणधीर कपूर म्हणाले की, ‘ऋषी कपूर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना कॅन्सरचा आजार असून श्वास घेण्यास अडचण होऊ लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी त्यांना अधिक त्रास होऊ लागला होता.