पिंपरी चिंचवड : वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशनच्या वतीने दिल्ली येथे आतंरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पिंपरी चिंचवड मधील आर्यन मार्शल आर्ट्स च्या खेळाडूंनी भारतीय संघातून खेळताना ११ सुवर्णपदक ६ रौप्यपदक व २ कास्य पदकासह एकूण १९ पदकांची लयलूट केली.
वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन च्या वतीने दिल्ली येथे ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान आतंरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जगभरातून ९ देशांचेे खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. महाराष्ट्रातूून १३४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
पारितोषिक मिळालेले खेळाडू पुढील प्रमाणे…
वैदेही पवार ३ गोल्ड मेडल
खुशी रेवाळे २ गोल्ड मेडल
तनिष्क भोरपे २ गोल्ड, १ सिल्व्हर मेडल
प्रवीण वाघ १ गोल्ड मेडल
तनुजा बिकुकले १ गोल्ड मेडल
ऑस्टिन १ गोल्ड, २ सिल्व्हर मेडल
विश्र्वतेज बिकुकाले १ गोल्ड मेडल
सागर पवार २ सिल्व्हर मेडल
हिमांशू खतवा १ सिल्व्हर मेडल
या स्पर्धेचे व्यवस्थापक म्हणून वाको महाराष्ट्र चे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी काम पाहिले तर प्रशिक्षक म्हणून दीक्षा मोरे, निलेश शेलार यांनी काम पाहिले.