मुंबई : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि मंगेश कदम यांनी ही घोषणा केली. अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या स्पर्धेत डॉ. जब्बार पटेल आणि प्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी अशी दोन नावे चर्चेत होती. मात्र कार्यकारणी समितीच्या बैठकीमध्ये एकमताने डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली.
१५ डिसेंबरला होणाऱ्या नियामक मंडळाच्या बैठकीत पटेल यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या बैठकीमध्ये १०० व्या नाट्यसंमेलन कुठे होणार याबद्दल अद्यापही निर्णय झालेला करण्यात आलेला नाही. दरम्यान, हिंदी आणि मराठीतील डॉ.जब्बार पटेल हे मोठं नावं आहे. त्यांची नाट्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे रंगकर्मींकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. डॉ. जब्बार पटेल यांनी अनेक नाटक आणि चित्रपटांचे दिग्दर्शिन केले आहे. यामध्ये ‘जैत रे जैत’, ‘मुक्ता’, ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘एक होता विदूषक’ यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.